महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा जन्म व जीवन

नागपूर हे शहर महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असून भारत देशाच्या सिमेनुसार मध्यभागी वसलेले शहर आहे. या शहरात गोळीबार चौक नावाचा मागासला समजला जाणारा प्रसिद्ध असा भाग आहे. भारतावर इंग्रजांचे राज्य सुरु असतांना त्यांच्यापासून त्याला स्वतंत्र करण्याकरिता भारतवासीयांनी नानाप्रकारचे सत्याग्रह केले. त्यातलाच एक ‘झेंडा सत्याग्रह’ १९२१ साली करण्यात आला होता.त्यातलाच एक भाग म्हणुन या परिसरात तो सत्याग्रह झाला. त्यात नागपूरवासियांनी भाग घेतला होता. या सत्याग्रहात लोकांनी इंग्रजाविरुद्ध त्यांना हा देश सोडून त्यांच्या देश्यात जाण्याचा नारा दिला होता. तेव्हा इंग्रजांनी या सत्याग्रहींना सळो की पळो करण्याकरिता बंदुकीच्या गोळ्या लोकावर झाडल्या होत्या. या शूरवीरांनी त्या गोळ्या आपल्या छातीवर झेलून देशाकरिता आत्मबलिदान केले आणि ते शहीद झाले. तेव्हापासून या भागाला गोळीबार चौक असे नाव पडले. आजही चौकात या शहिदांच्या स्मृतीप्रीत्यर्त शहीद स्तंभ उभारण्यात आला आहे.

हा गोळीबार चौक पुढे मोहल्ला म्हणून प्रचलित झाला. या मोहल्ल्यात हिंदू संस्कृतीतील ‘हलबा’ या आदिवासी जमातीचे लोक मोठ्या संखेने राहतात. या चौकाच्या बाजूलाच एक उदारम महाराजांचा प्रसिद्ध मठ आहे. या मठाच्या मागे आदिवासी जमातीतील ठुब्रीकर घराण्यातीलचर सख्खे भाऊ राहत असत. त्यांची नावे तानबा, महादेव, विठोबा आणि बालाजी अशी होती. त्यांचा मुल धंदा विणकरी (पातळ वीणणे) हा होता. चारही भावंडे संयुक्त कुटुंब पद्धतीने एकत्रित राहत होती. घरची परिस्थितीअत्यंत गरिबीची होती. रोज विणकरी करून सायंकाळी मजुरी मिळाल्यावर ते घरगृहस्थी चालवित असत.

अशा या दरिद्री कुटुंबात महानत्यागी बाबा जुमदेवजी ३ एप्रिल १९२१ रोजी श्री विठोबा राखडू ठूब्रीकर आणि सरस्वतीबाई या दांपत्याच्या पोटी जन्माला आले. या दांपत्याचे बाबा हे चवथे अपत्य होय. बाबाब पेक्षा तीन भावंडे बाळकृष्ण, नारायण आणि जगोबा ही मोठी होती तर एक भाऊ मारोती हा सर्वात लहान होता.  अशी पाच अपत्य या दांपत्याला होती. बाबांचे लहानपणचे नाव जुम्मन असे होते. 

घरची परिस्थिती हालाकीची आणि एकत्रित कुटुंब यामुळे बाबांचे शिक्षण मराठी चवथ्या इयत्तेपर्यंत झाले. खर्च जास्त मिळकत कमी यामुळे बाबांनी पुढील शिक्षण मधेच सोडून घरच्या परिस्थितीला हातभार लावण्याचे ठरवून त्यांनी अगदी वयाच्या बाराव्या वर्षी वाडवडिलांच्या चालत आलेल्या ‘विणकरी’ च्या धंद्याला सुरुवात केली. 
लहानपणापासूनच बाबांचा उमदा स्वभाव होता. चेहऱ्यावर तेज होते. सौष्ठव देहयष्टी होती. लहानपणापासूनच त्यांच्यात कणखरपणा होता. ते लहानपणापासूनच नितीमत्ता बाळगत होते. ते दयाळू स्वभावाचे असून परमेश्वरावर त्यांचा बालपणापासूनच विश्वास होता. त्यांना लहानपणी हनुमान चालीसा वाचण्याचा छंद होता. ते रोज सायंकाळी हनुमान चालीसा वाचत असत. प्रायमरी शाळेत शिकत असतांना शाळेतून आल्यानंतर स्वयंपाक घराचे दार बंड असल्यास ते दाराच्या फटीतून आत बघत असत तेव्हा त्यांना त्या खोलीत भुरकत रंगाची व्यक्ती असल्याची दिसत असे. तसेच त्या व्यक्तीला एकाच फार मोठा डोळा असलेला त्यांना नेहमी दिसायचा.
जुन्या काळात देहयष्टीला फार महत्व होते. म्हणून ठिकठिकाणी आखाडे बांधले गेले होते. या आखाड्यात लहान – मोठी मुले मेहनतीसाठी जात असत. त्याप्रमाणे बाबांना पण आपल्या बालपणी आखाड्यात जाण्याचा छंद लागला आणि बघता बघता ते त्या परिसरात पहेलवान या नवाने प्रसिद्ध झाले. त्यांना कुस्ती खेळण्याचा शौक होता.
बाबांचे लग्न त्यांच्या वयाच्या सतराव्या वर्षी म्हणजे १९३८ साले मे महिन्यात नागपूर जिल्ह्यातील प्रतिष्ठीत निवासी श्री. बापुजी बुरडे यांची सुकन्या आणि तडफदार व अग्रगण्य विणकर नेते श्री. सोमाजी बुरडे यांची धाकटी बहिण वाराणशी हिच्याबरोबर झाले.
बाबांनी लग्न झाल्यावर वयाच्या एकोणविसाव्या वर्षी विणकरीचा धंदा सोडून दिला व ते सेठ केसरीमल यांच्या दुकानात वाहिखाते लिहिण्याचे काम मासिक तीस रुपये पगारावर करू लागले. दुकानमालक मारवाडी समाजाचे होते. सेठ केसरीमल मरण पावल्यामुळे त्यांचा मुलगा मदन सेठ पुगलिया हा त्याचा मामा सेठ सरदारमल याच्या देखरेखेखाली दुकानाचा कारभार सांभाळत होता. बाबांनी तेथे पाच- सहा वर्षे नौकरी केली. बाबा जेथे नौकरी करीत होते ते दुकान सोन्याचांदीचे होते.
एक दिवस बाबांना दुकान साफ करतांना दहा तोळ्यांचा सोन्याचा हार दुकानाच्या कपाटात ठेवलेला दिसला. तो हार उघड्यावरबघून बाबांना धक्काच बसला. बाबांनी तो हार सेठ सरदारमलकडे नेऊन दिला. त्यांनी डागाजीला बोलाविले. तो त्यांचा भाचा होता  त्यांनी हाराबद्दल डागाजीला विचारले आणि त्याला एक जोरदार थापड लावली. ते त्याला म्हणाले की, तो (बाबा) इमानदार आह म्हणून हार आणून दिला, नाही तर हा हार चोरीला गेला असता किवा हरवला असता. तर त्याला कोण जिम्मेदार राहिले असते ? यावरून बाबांचे सत्य व इमानदारी हे गुण दिसून आलेत. तेव्हापासून बाबांकडे त्या घरातील लोक इमानदार म्हणून पाहू लागले. मदनसेठचा लहान भाऊ पैसे उधळतो हे बाबांना माहिती होते म्हणून बाबांनी स्वतः चा विचार केला की, आज जरी इमानदार म्हणतात परंतु उद्या हीच परिस्थिती राहील कशावरून ? नौकर माणूस इमानदार असून सुद्धा उद्या प्रसंग आल्यास हेच लोक भाच्याचा पक्ष घेऊन त्याला बदनाम करू शकतात. असा विचार मनात येताच केवळ सत्य जपून ठेवण्याकरिता बाबांच्या मनात त्या विचारांनी जोर धरल्यामुळे त्यांनी ती नौकरी सोडली आणि पूर्ववत ते साडी विणण्याचा उद्योग करू लागले.
बाबा दिवसातून एक रेशमाची नऊवारसाडी विणत असत. ती साडी इतकी चांगली असायची की, दुकानदार लोक आपला माल खपविण्यासाठी ती गिऱ्हाइकाला दाखवण्याकरिता वर ठेवत असत. परंतु हातमागाच्या धंद्याला मिलमुळे उतरती कळा आली. बाबांचे मेहुणे श्री सोमाजी बुरडे हे विदर्भ विणकर केंद्रीय सोसायटी नागपूर येथे अध्यक्ष होते. म्हणुन त्यांनी बाबांना तेथे सुपरवायझरची नौकरी दिली. बाबांचे कामातील चातुर्य आणि महत्ता बघून त्यांना सोसायटी तर्फे गड्डीगोदाम, नागपूर येथे पायांनी चालवावयाचा चादर करण्याचा मशिनीच्या ट्रेनिंग करीता पाठविले. तिथे बाबांनी ट्रेनिंग पूर्ण केली. पिवळी मारबतच्या जवळ सोसायटीचा एक कारखाना होता. त्या कारखान्यात बाबा कामाला लागले. बाबा इतके हुशार होते की, स्वतः एकटेच कोणाचीही मदत न घेता संपुर्ण मशीन उघडून तिचे पार्ट वेगवेगळे करून जशीच्या तसी पूर्ववत स्थितीत तिची जुळवाजुळव करीत असत. याच सुमारास बाबांनी दैवी शक्ती ही प्राप्त केली होती.
एके दिवशी याच कारखान्यात काम करणाऱ्या वासुदेव नंदनकर नावाच्या, बाबांच्या घराजवळ राहणाऱ्या आणि बाबांचा मित्र पण असलेल्या गृहस्थाला काम करताना सारखे जुलाब आणि उलट्या होऊ लागल्यात. तेव्हा आपल्या मित्राचे होत असलेले हाल बाबांना पाहवले नाही. म्हणून त्यांनी त्याला जवळ बोलावून एका ग्लासात पाणी घेऊन त्यास अकरा वेळा फुक मारून तीर्थ दिले. त्यामुळे त्याला होणारा त्रास एकाएकी बंद झाला. तेव्हापासून बाबाजवळ काही तरी शक्ती आहे हे लोकांना माहित झाले. पुढे बाबांनी त्या कारखान्याची नौकरी सोडली आणि ते महानगरपालिकेत ठेकेदार म्हणून काम करू लागले.  
ही घटना १९७६ ची आहे. नागपूर येथील दिघोरी या भागात महानगरपालिकेतर्फे नहर खोदण्याचे काम बाबांना मिळाले होते. ते काम करतांना त्यांना त्या कामात खूप त्रास झाला. त्यांना त्या ठिकाणी सुद्धा बेइमानी दिसू लागली त्यामुळे पुन्हा बाबांचे मन त्या बेइमानीला कंटाळल.  त्यांच्या स्वाभिमानी स्वभावाला ते पटत नव्हते. याच सुमारास बाबांचा मुलगा डॉ. मनो ठूब्रीकर यांना व्हर्जिनिया मेडिकल सेंटर, व्हर्जिनिया ( अमेरिका ) येथे नौकारी लागली होती.त्यांना पहिला पगार मिळाल्यावर त्यांनीं बाबांना सांगितले की, आता काम बंद करून आपण परमेश्वराचे मानवजागृतीचे कार्य करावे. बाबांनी विचार करून आणि सध्याच्या घडणाऱ्या बेइमानीच्या व्यवहाराला कंटाळून त्यांनी ठेकेदारीचा धंदा बंद केला. त्यानंतर त्यांनी अध्यात्मिक कार्याकडे आपले संपुर्ण जिवन वळविले.
बाबा जेव्हा काम करत होते तेव्हा ते मित्राबरोबर राहूनही स्वतःचा आणि त्यांचा खर्च स्वतःच करीत होते. ते कोणालाही खर्च करू देत नव्हते. बाबा १९७६ पासुन भगवतकार्याकरिता स्वतःच्या पैशाने खेडोपाडी, उन, पाऊस, थंडी या कशाचीही पर्वा न करता पायी, सायकल, बैलगाडी, बस मिळेल त्या साधनाने प्रवास करून मानव जागृतीचे कार्य निष्काम भावनेने बाबांनी केले आहे. लोकांचे नाना तऱ्हेचे दुख निवारण केले आहेत. ते गुरुपूजा घेत नव्हते. आत्म्याचा अनादर होऊ नये म्हनुन पाया पडू देत नव्हते.
अध्यात्मिक कार्याद्वारे खंगलेल्या गरीब, कष्टकरी  लोकांना सुख व समाधान मिळवून दिल्यानंतर त्याला जीवनात चालण्याकरिता, त्यांची गृहस्थी उंच आणण्याकरिता त्यांनीं आपले सर्व लक्ष सामाजिक कार्याकडे वळवून सहकारी तत्वावर परमात्मा एक सेवक नागरिक सहकारी बँक, बहु-उद्देशीय ग्राहक भांडार, दुध डेअरी, मानव मंदिर इतयादींची स्वकष्टाने निर्मिती केली. परंतु हे सर्व केल्यावर सुद्धा त्यांनी स्वतःच्या गृहस्थीकरिता या संस्थेचा लाभ कधीच करून घेतला नाही. त्यांनी अध्यात्मिक आणि सामाजिक कार्यात नेहमी त्याग केलेला आहे. आपल्यासारखे अनेक शिष्य तयार केलेले आहेत आणि ‘आपल्यासारखे करिती तात्काळ, नाही काळवेळ तया लगी’ ही म्हण सिद्ध केली आहे. म्हणूनच त्यांना त्यांच्या शिष्यांनी ‘महानत्यागी’ ही पदवी दिली आहे. बाबांनी गृहस्थी सांभाळून परमार्थ साधला आहे.
 परमात्मा एक सेवक नागरिक सहकारी बँक, बहु-उद्देशीय ग्राहक भांडार, दुध डेअरी, मानव मंदिर, मानव धर्मा चे  संस्थापक सर्वांचे आपण सर्वांचे सदगुरू महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे दु:खद निधन गुरुवार दिनांक ०३/१०/१९९६ रोजी रात्री ११.३५ ला झाले. बाबांची अंतयात्रा दिनांक ०७/१०/१९९६ रोज सोमवारला सकाळी ११ वाजता बाबांचे निवासस्थान टिमकी येथून निघून त्यांच्या पार्थिव देहावर गंगाबाई घाट येथे लाखोच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आले. 
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी आपले देह चंदना सारखे झिजवुन एका भगवंताची प्राप्ती करून मानव धर्माची स्थापना केली आणि मानव धर्म आपल्या पुरताच मर्यादित न ठेवता आपल्या सारख्या अनेक गोर-गरीब, दुखी-कष्टी आणि व्यषणाधिष्ट लोकांना निष्काम भावनेने सेवा वाटून दिली आणि अनेकांना सुखाचा मार्ग दाखवला. अशा महामानवाला युवा सेवकांचा ग्रुप तर्फे कोटी कोटी प्रणाम.

3 comments: